ताज्या घडामोडी

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला कडून प्राथमिक शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

दि. पि. ई. एस. विद्यालय पिंपळखुटा मुख्याध्यापक व शिपाई ह्यांच्यावर फ़ोजदारी कार्यवाही करून कार्यमुक्त करण्याची मागणी

अविनाश पोहरे / संपादक

पातूर तालुक्यातील दी. पी. ई. एस. विद्यालय पिंपळखुटा येथे दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास शालेय विद्यार्थ्याचा शालेय पोषण आहार उर्वरित होता उर्वरित पोषण आहार हा प्रत्येक विद्यर्थ्याला परत द्यावा असे स्पष्ट आदेश असताना सुद्धा दि.पी.ई. एस. विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप चव्हाण व शिपाई सुरेश खोडके यांना तांदूळ चोरी करून नेताना सर्व गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले व त्या सर्व प्रकारच्या व्हिडीओ चे चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते.सदरहू प्रकरणात असलेले मुख्याध्यापक व शिपाई ह्यांनी घटनास्थळावरन पळ काढला व चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घटनेचा पंचनामा करून सुद्धा शालेय पोषण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ह्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दिली नाही तरी सुद्धा प्राथमिक शिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल हा पूर्णपणे खोटा असून प्राथमिक शिक्षण विभाग अकोला व पंचायत समिती पातूर प्रकरण दडपत असून ह्या प्रकरणात मुख्याध्यापक संदीप चव्हाण व शिपाई सुरेश खोडके ह्यांनी विद्यर्थ्यांच्या हक्काचा शालेय पोषण आहार विकण्याचाच उद्देशाने नेला होता तरी ह्यांच्यावर तात्काळ फोजदारी कार्यवाही करून ह्यांना कार्यमुक्त करण्यात यावे आशा मागणीचे निवेदन देऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी अकोला ह्यांच्या कार्यालयात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून शिक्षण विभागाच्या चुकीच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.असून कार्यवाही न झाल्यास ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला द्वारा देण्यात आला असून त्यादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण शिक्षण विभाग व प्रशासन ह्यास सर्वस्वि जबाबदार राहील ह्यावेळी आंदोलनकर्ते रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे,हरिष गुडधे, बाळापूर तालुका अध्यक्ष पंकज इंगळे,रोहीत भारसाकळे,स्वप्नील शेजव,दादू भारसाकळे, संतोष गवई,भूषण खंडारे,मिलिंद टोबरे, स्वप्नील सरदार आदींसह असंख्य पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: