पिंपळखुटा हायस्कूल शालेय पोषण आहार प्रकरणी त्रिस्तरीय समिती संशयाच्या भोवर्यात

त्रिस्तरीय समिती ने मुख्याध्यापक यांना दिली क्लीन चिट
शालेय पोषण आहार चोरी प्रकरणी चौकशी समिती अहवाल म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – अरविंद पाटील
अविनाश पोहरे / पातूर
पातुर : 18 सप्टेंबर 2020 रोजी दि पी ई एस हायस्कूल पिंपळखुटा येथे रात्री 9.30 वाजता शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरी करताना मुख्याध्यापक संदीप चव्हाण व खोडके यांना पिंपळखुटा ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. हे प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणले होते यामध्ये प्रहार संघटनेचे सेवक अरविंद पाटील यांनी पातूर पंचायत समितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले परंतु यामध्ये त्रिस्तरीय समिती गठित केली त्यानंतर शालेय पोषण आहार अधीक्षिका वर्षा कल्याणकर ह्या दिनांक 23 सप्टेंबर रोजी पिंपळखुटा येथे चौकशीसाठी गेल्या असता मुख्याध्यापक संदीप चव्हाण व प्रयोगशाळा परिचय खोडके हे 29 सप्टेंबर पर्यंत रजेवर होते त्यामुळे दिनांक 25 सप्टेंबर रोजी चौकशी समिती गठीत करण्यात आली सदर चौकशी समिती 30 सप्टेंबर रोजी चौकशी करून 5 ऑक्टोंबर रोजी समितीने शिक्षणाधिकारी प्राध्यापक वैशाली ठक यांना चौकशी समितीच्या अहवाल सादर केला परंतु सदर अहवाल हा दिशाभूल करणारा असून चोरांच्या उलट्या बोंबा आहेत.असे आरोप प्रहार संघटनेचे सेवक अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये केले.