सद्गुरु दादा अकोटकार यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना सेफ्टी किट वाटप कार्यक्रम संपन्न

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील छत्रपती प्रतिष्ठान चे सद्गुरू दादा अकोटकार यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा येथील बस स्थानक कर्मचारी यांना कोरोना सेफ्टी किट वाटप करण्यात आले.
श्री छत्रपती प्रतिष्ठान नेहमीच सदैव सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.संपूर्ण देशात कोरोनाचे संकट असून अश्या संकट समयी बस स्थानक येथील वाहक चालक कर्मचारी सेवा देत आहे.या कर्मचारी बांधवांच्या कोरोना विषाणूच्या सेफ्टीच्या साठी छत्रपती प्रतिष्ठान ने या कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर,हँड गोल्झ वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला तेल्हारा पोलिस स्टेशन चे ठाणेदार विकास देवरे साहेब यांनी प्रमुख उपस्थित लावली .या कार्यक्रमाला छत्रपती प्रतिष्ठानचे, पप्पू सोनटक्के, रामा फाटकर, दिलीप पिवाल ,गजानन गायकवाड, किशोर डांबरे, आशिष जयस्वाल, राम वाकोडे,सचिन थाटे,हर्षल ढोकने,सागर चहाजगुणे, गौरव धुळे, स्वप्नील सुरे, विठ्ठल मामनकर,आकाश फाटकर,प्रज्वल मोहोड, निलेश जवकार, आशिष राठोड,शाम हागे, सुमित बाभुळकार, गोलू सोनटक्के, शाम माहूरे, यांची उपस्थिती होती.