ताज्या घडामोडी
बावन वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला. बाळापूर तालुक्यातील चान्नी फाटा शेतशिवारात बावण वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे यामध्ये प्राप्त माहिती नुसार सदर बाळापूर पातूर मार्गावरील चान्नी फाटा शेतशीवारात वाडेगाव येथील शेतकरी रामराव अवचार यांच्या शेतात आढळून आलेला इसम बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कीसन ढोके असल्याची माहिती असुन माहिती मिळताच बाळापूर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होवून सदर इसमाचा मृतदेह पुढील तपासासाठी पाठवून अधिक तपास करीत असल्याची माहिती समोर आली आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.