धनगर आरक्षण महासंघाचे उपविभागीय अधिकारी दर्यापूर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापुर ; तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी दर्यापूर उपविभागीय कार्यालयावर निवेदन सादर महाराष्ट्रातील धनगर जमातीस तात्काळ अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित पूर्ण करणे व एसटी प्रवर्गाचा दाखला देणे. धनगर समाजाच्या विविध योजनांचा लाभ सुरू करणे.तसेच मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळण्याकरिता कठोर कायदे करणे.1000 कोटी रुपयांची सरकारने तरतूद करून सुद्धा अजून पर्यंत अनुदान मिळाले नाही ते त्वरित मिळावे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाच्या एक हजार कोटी रुपयांचा निधी यांची चौकशी झाली पाहिजे व तो निधी मेंढपाळ बांधवांना त्वरित मिळाला पाहिजे.धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊनच मेघाभरती करावी.अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबत तरतूद केली असूनही शासनामार्फत सदर बाबीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे धनगर समाज हा मुळातच अनुसूचित जमातीमध्ये असतानासुद्धा शासनस्तरावरून सदरची सवलत लागू केल्या जात नसल्यामुळे धनगर समाज सतत आंदोलने उपोषण चक्काजाम इत्यादि करीत असून 70 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्या करिता वंचित ठेवले आहे त्यामुळे संपूर्ण धनगर समाज अत्यंत हालअपेष्टाचे जीवन जगत आहे कर्नाटक व काही राज्यांमध्ये धनगर जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी अशी संपूर्ण धनगर समाज बांधव यांच्यातर्फे आग्रहाची विनंती आहे व सरकारने तातडीने उपरोक्त मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा कोरोनाच्या गंभीर काळात सुद्धा प्रचंड व प्रखर आंदोलन करावे लागेल याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असा इशारा धनगर आरक्षण महासंघ दर्यापूर व तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधव यांच्या वतीने देण्यात आला असून सदर मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यामार्फत देण्यात आले
त्यावेळी अॅड.दिलीपभाऊ एडतकर,उमेशभाऊ घुरडे, मातकर साहेब डॉ.काळमेघ यांच्या सहकार्याने साहेबरावजी भदे,सदानंदजी नागे,विलासराव अगंडते अशोकराव नवलकार श्रीधर कोल्हे,डॉ.संदीप सुशिर अरविंदजी पावडे,खंडोजी पातुर्डे,अमोल नवलकार,उमेश नागे,हरिभाऊ नागे,दिगंबर नवलकार,नंदकिशोर कोगदे अक्षय घटाळे,माणिकराव नागे,ऋषिकेश लाखे,अमोल कात्रे,सुनील गावंडे,शेखर पातुर्डे, सोपान काईंगे,अंकुश गावंडे, पियुष घटाळे,अमोल पातोंड, विशाल नवलकार,अंकुश जोगी, ज्ञानेश्वर कातकडे,संतोष कातकडे,यश जाधव,संजय पातुर्डे,योगेश पातुर्डे, संजय अघडते, शंकरराव भदे प्रकाश वरखडे बाळासाहेब पावडे संदीप नवलकार,गंगाधर साबे,संजय घटाळे,हरिष नागे,अनिल घटाळे,गजाननराव पातोंड, दीपक लताड,सतीश अघडते,गोपाल नवलकार,चेतन पाचपोहे,गोपाल नागे, कपिल घुरडे,आशिष ईसळ केशवराव भदे,दत्तात्रय राऊत, सतीश मालठाणे,रामेश्वर गावंडे, अतुल नवलकार,राजू होपळ, दिनेश तांबडे,गजानन नवलकर, संदीप गोडंबे, गजानन गुरव, गोपाल चारथळ, मंगेश भदे,गणेश कात्रे,शिवम हांडे,अमोल सरोदे, प्रशांत गादे,अमोल पंडित,गणेश माने,सुधीर पांडे रोशन कातकडे सुरेश गंधे अशा असंख्य धनगर समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये धनगर आरक्षण महासंघ व समस्त धनगर समाज संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते,ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक,समाजसेवक तसेच समस्त धनगर समाज बंधू-भगिनी यांच्या समर्थनात शासकीय नियमांचे पालन करीत पुढील आंदोलनाचा इशारा देऊन निवेदन सादर करण्यात आले.