वाढत्या महिला अत्याचार संदर्भात प्रधानमंत्री यांना ५०० पत्र पाठवून निषेध

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या.वतीने प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार अकोला महीला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष सुनिता ताथोङ यांनी हाथरस येथे दलित कुटुंबातील मनिषावर बलात्कार करून तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केली आणी तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देता परस्पर जाळण्यात आला. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आदरणीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी साहेब उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब यांना ५०० पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित जिल्हा सचिव शहनिज शेख, तालुका उपाध्यक्ष रमाताई तायङे, सहसचिव कनिजा परविन,शहर उपाध्यक्ष शाहीन परविन,सिंधुताई वानखङे,ज्योती तायङे, मंगलाताई ङोंगरे, सुनिता दूरवर,मालीनी गाडेकर,अस्मिता वानखडे,व इतर महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.