हाथरस येथील घटनेचा पारस येथील सर्व पक्षाकडून निषेध

महेश उमाळे
ग्रामीण प्रतिनिधी पारस
कॅण्डल मार्च काढून वाहली नागरिकांनी श्रद्धांजली
पारस :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित युवतीवर झालेल्या क्रूर अत्याचारामुळे सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. त्याचं प्रमाणे बाळापूर तालुक्यातील पारस येथील विविध पक्षांकडूनही झालेल्या घटनेचा निषेध करण्यात येत असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाळापूर तालुक्यातील ग्राम पारस येथे दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महात्मा फुले चौकात नागरिकांनी महात्मा फुले पुतळ्या समोर मेणबत्ती लावून कॅन्डल मार्च ला सुरुवात केली. सदर कॅन्डल मार्च गावातील महात्मा फुले चौक, महात्मा गांधी चौक मार्गे शिवाजी चौक येथे कॅन्डल मार्च समारोप करून शिवाजी पुतळ्या समोर गावातील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मेणबत्त्या लावून सामूहिक श्रद्धांजली वाहली.
या घटनेच्या निषेधार्थ व कॅन्डल मार्च मध्ये पारस गावातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.