तहसीलदार राजेश सुरडकर यांची बदली अल्प वेळातच सर्वांची मने जिकलेला अधिकारी

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्याने पुन्हा तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या रूपाने पुन्हा कार्यक्षम अधिकारी गमावला आहे गेल्या दीड वर्षातच बदली झाली कारण हे तसेच आहे गेल्या मागील एक वर्षातील त्याची कामगिरी पहाता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यकाळ असो त्यांनतर मार्च महिन्यात आलेल्या कोरोना वैश्विक महामारीचा काळ असो त्यांनी अत्यंत चोख व कार्यक्षम पद्धतीने परिस्थिती हाताळणी केली त्यातच सततच्या पावसाने शेतकरी हतबल झाला शासनाच्या आदेशाने शेतकरी मदत मिळण्यासाठी तातडीने तालुका सर्वेक्षण करून शासनाला योग्य वस्तुस्थिती अहवाल पाठवून आपले संविधानिक कर्तव्य पार पाडले त्यामुळेच अनेक शेतकरी यांना वेळेत शासकीय मद्यत प्राप्त झाली असे अनेक शेतकरी यांनी बोलताना सांगितले तसेच तालुक्यातील पत्रकारांना वेळेत सर्व माहिती देऊन जनमाहिती आपल्या विविध प्रसिद्धीस दिली व आपली अचूक प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली तसेच महत्वाची बाब म्हणजे तालुक्यातील विविध पक्ष संघटनेच्या नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याचे संम्बध जोपासत त्यांनी सर्वांना सोबत ठेवत तालुक्यातील महसुली कामे अत्यन्त चोखपणे पार पाडत आपले कर्तव्य पार पाडले आहे त्यामुळे अश्या कार्य तत्परतेने कार्य सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्व असलेले प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची अल्प वेळात ओळख निर्माण झाली होती विशेष बाब म्हणजे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले मत बोलतांना व्यक्त केले की राजेश सुरडकर साहेब यांनी तेल्हारा तालुका तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून कधीही अन्य अधिकारी यांना असभ्य वागणूक दिली नाही त्यांनी अत्यंत तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याशी समनव्यातुनच आपली शासकीय सेवा पार पाडली आहे त्यांच्या या तेल्हारा तालुक्यातील अत्यल्प कार्यसेवेचे सर्वत्र कौतुक होत असून मात्र दुसरीकडे अत्यन्त चांगला व हुशार अभ्यासू प्रशासकीय अधिकारी गमावला असून त्यांच्या बदलीने तेल्हारा तालुक्याने पुन्हा चांगला अधिकारी गमावला आहे हे बोल चुकीचे ठरणारे नाहीत