पिंप्री खुर्द येथे कपाशीवर तुडतुडे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात

शरद भेंडे
ग्रामिण प्रतिनिधी पिंप्रि खुर्द
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द परीसरात गत दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिडयांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडले आहेत तालुक्यातील काही ठिकाणी फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या शिरेजवळ राहुन पानातील रस शोषून घेत आहेत फुलकिड्यांनी रखडलेल्या भागावर पांढरे चट्टे दिसुन येत आहेत प्रादुर्भाव ग्रस्त भागातील कपाशीच्या पानांच्या पेशी शुष्क होत असुन जास्त प्रादुर्भाव असणारे भागात पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे यावर अंकुश लावण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना व्यवस्थापनासाठी उपाययोजना मार्गदर्शन करावे ही मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.