ताज्या घडामोडी

नया अंदूरा गावात मुलभूत सुविधांचा अभाव

अंकित क-हे

ग्रामिण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालूक्यात येत असलेले नया अंदूरा हे गाव १९५९ मध्ये आलेल्या माहापूरामुळे पुनर्वसन झालेले असून अघापही या गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे गावात जागोजागी पाणी साचल्यामुळे सर्वत्र घाण पसरली आहे प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.येथील आरोग्य डाॅक्टर किंवा आरोग्य सेवक यांनी नया अंदूरा गावात पाच महिन्यापासून भेट सुद्धा दिली नाही नया अंदूरा गावात शासनाच्या नविन धोरणानुसार (टाउन प्लानिंग) वसलेले आहे त्यामुळे गावातील मुख्य रस्ते ४० फुट व सर्विस लाइन ३० फुटाची असल्यानंतर सुध्दा गावातसांडपाणी सर्विस लाइन मधून जात नसल्याने गावात दुषीत पाणी साचल्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोकादायक ठरू शकते नया अंदूरा गावातील ठिकाणी दुषीत पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका गावातील गजानन महाराज मंदिराच्या आवारात तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या पाठीमागे सहा महिन्यापासून दुषीत पाणी साचल्यामुळे हे पाणी येथील लोकांना धोकादायक ठरू शकते तरी सुद्धा प्राथमिक आरोग्य उर केंद्र उरळ बु.येथील आरोग्य सेवक यांनी नया अंदूरा गावात भेट दिली नाही गावातील लोकांना साचलेल्या पाण्यामुळे अनेक आजारांना समोरे जावे लागत आहे त्यामध्ये या पाण्याची दुर्गंधी सर्वीकडे पसरत आहे याकडे प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.येथुन नया अंदूरा गावासाठी असलेले आरोग्य सेवक यांनी गावात येउन परिसरातील लोकांची परिस्थिती जाऊन त्यांना दुषीत पाण्यापासून काही इनपेशंन होत असल्यास तपासणी करून घ्यावी नया अंदूरा गावात साचलेल्या दुषीत पाण्यापासून गावातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याला जवाबदार समंधित प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.येथील आरोग्य डाॅक्टर किंवा नया अंदूरा ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी राहतील नाहीतर नया अंदूरा गावात सहा महिन्यापासून दुषीत पाणी साचलेले असल्याने सांडपाणी लवकरात लवकर गावाबाहेर काढावे अशी मागणी व्यक्त केली जात आहे नया अंदूरा गावातील पथदिवे सहा महिन्यापासून बंद असल्याने नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालय पथदिवे चालू करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे तसेच नया अंदूरा गावात जागोजागी दुषीत पाणी थेट रोडवर येत आहे ग्रामस्थांना दुषीत पाण्यापासून दररोज ये -जा करावी लागत आहे तसेच गावातील लहान मुलांना घेळण्यासाठी असलेले गावातील गजानन महाराज मंदिर आहे तेथे येथे दुषीत पाण्याची नदी आहे त्यामध्ये विषारी साप आहेत दररोज ग्रामस्थांना पाण्यात साप खेळतांना दिसुन येत आहेत गावातील लहान मुले तेथे दिवसभर खेळत असतात त्यांना काही इजा झाल्यास जवाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.येथील आरोग्य डाॅक्टर किंवा नया अंदूरा गावासाठी असलेले आरोग्य सेवक यांनी नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी तक्रार देऊन गावातील सांडपाणी गावाबाहेर काढण्याचे सांगावे नाहीतर नया अंदूरा गावातील लोकांना काही इजा झाल्यास त्याला जवाबदार प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.राहील नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील लोकांच्या जिवाशी कोणताही खेळ न खेडता गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी व पथदिवे सुरळीत चालू करावे नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या प्रशासकीय अधिकारी यांनी नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर किंवा दररोज हजर राहावे
सध्या कोरोणाचे संकट संपूर्ण देशात सुरू असल्यानंतर मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जवाबदारी अशी मोहीम राबवली आहे तशीच नया अंदूरा गावात आलेल्या ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी यांनी माझे गाव माझी जवाबदारी अशी मोहीम राबवली पाहिजे व गावातील अडचण दुर करायला पाहिजे परंतु असे केव्हा होणार आहे असे सुद्धा ग्रामस्थांना वाटत आहे लवकरात लवकर नया अंदूरा गावातील प्रत्येक अडचण दुर करावी अन्यथा गावातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याला जवाबदार प्राथमिक आरोग्य उप केंद्र उरळ बु.नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयात आलेले प्रशासकीय अधिकारी राहतील अशी माहिती ग्रामस्थांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: