ताज्या घडामोडी

डॉक्टर नानासाहेब चिंचोळकर महाविद्यालय वाडेगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध पदवी, पदविका व विविध प्रमाणपत्र कोर्सेस नव्याने सुरू

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असलेल्या डॉ नानासाहेब चिंचोळकर महाविद्यालय, वाडेगाव येथे विद्यापीठाने बी.कॉम.या पदवी शिक्षणक्रमासह मूल्यशिक्षण, स्वयं-सहाय्य गट प्रेरक-प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम,आणि सहकार व्यवस्थापन पदविका या शिक्षणक्रमांना शैक्षणिक सत्र 2020-21 पासून नव्याने मान्यता प्रदान केली असून सदर शिक्षणक्रम महाविद्यालयात सुरू झाल्याबद्दल संस्थेचे सचिव तथा मार्गदर्शक प्रा.डॉ.जगदीश दौलतराव चिंचोळकर यांचे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या वतीने सुद्धा आभार मानून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. जगदीश दौलतराव चिंचोळकर यांनी परिसरातील शिक्षणापासून वंचित खंड पडलेल्या तसेच शिक्षणास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिक्षणक्रमांना प्रवेश घ्यावा असे आवाहन केले
डॉ.नानासाहेब चिंचोळकर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पूर्वतयारी,
बीए,कॉम,सहकार व्यवस्थापन पदविका,
गांधी विचार दर्शन पदविका,बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्रशिक्षणक्रम,
स्वयम सहाय्य गट प्रेरक-प्रेरिकांचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम,मुल्यशिक्षणाची मुलतत्वे मूलभूत प्रमाणपत्र शिक्षणक्रम
इत्यादी शिक्षणक्रम सुरू असून विद्यार्थ्यांनी या शिक्षणकमास प्रवेश घेण्याचे आव्हानही यावेळी प्रा.डॉ.जगदीश दौलतराव चिंचोळकर यांनी केले.
याप्रसंगी प्रा.डॉ. जगदीश दौलतराव चिंचोळकर यांचे स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री के.व्ही. नानोटी,श्री जी.टी. शेगोकर,केंद्र सहाय्यक श्री राजूभाऊ अवचार, श्री फुलउंब्रीकर सर
उपस्थिती,दिगंबर भाऊ भुस्कुटे, संजय भाऊ निबोकार ,बंडू हुसे,विष्णू भाऊ मानकर व विद्यार्थी अनिकेत भुस्कुटे यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: