संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे कँडल मार्च

अनंतकुमार गवई नवी मुंबई
उत्तरप्रदेशमध्ये अलिगढ जिल्ह्यातील हाथरस गावात १४ सप्टेंबर २०२० रोजी मनिषा वाल्मिकी या १९ वर्षीय निष्पाप विद्यार्थींनीवर चार नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन अमानुषपणे गंभिर अत्याचार केले. तिची जीभ छाटली, मणके मोडण्यात आले अन् तिला अत्यावशक उपचार मिळाले नसल्यांने २९ सप्टेंबर २०२० रोजी तिचा मृत्यू झाला.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रासह काही राज्यात राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळया पातळ्यांवर भयानक, अमानुष, निर्दयपणे होणारे अन्याय अत्याचार माणूसकीला अन् कायदा सुव्यवस्थेला काळिमा फासणारे आहेत. आरोपींना कायद्याचा धाकच नसल्यासारखी त्यांची कृत्ये असतात. त्यामुळे, अशा घटनांमध्ये आरोपींना वेळीच कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, पुन्हा कोणी अशी कृत्ये करण्याचे धाडस करणार नाहीत.
त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींवर फाशीची शिक्षा कायम करावी, खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा या मागणी करिता चिंचोली तलाव येथून नवरात्र चौक सेक्टर 23 जुईनगरपर्यंत काल गांधी जयंती दिनी सायंकाळी ७ वाजता संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. सदर घटनेचा, संघर्ष युवा प्रतिष्ठान तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. त्या संबंधी संघर्ष युवा प्रतिष्ठान तर्फे नेरुळ पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र ही देण्यात आले.