गाडेगांव येथे आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर ग्राम कार्यक्रम संपन्न

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथे आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरीत महाएनजीओ फेडरेशन आयोजित सहभागी संस्था जय कालिका माता बहुउद्देशीय महिला विकास संस्था अकोला व ग्रामपंचायत गाडेगाव यांचे विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या जन्म दिनानिमित्त १४ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०२० या कालावधीत सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करूण गावांमध्ये २ आक्टोंबर रोजी नाविन्यपूर्ण कार्यक्रम सर्व प्रथम महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली,ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले, गावात मुलांच्या व महिलांना घेवून गावात रॅली काढण्यात आली, तसेच महिलांनी स्मशान भुमी येथे वृक्षारोपण करण्यात आले, व त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देवून त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी गाडेगाव सरपंच प्रमोद वाकोडे, संस्थेच्या अध्यक्षा सुनिता राठोड सीआरपी शारदाताई मोरवाल,ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुनिता काळे, मंगलाताई सोनोने सचिव, वर्षा फुंडकर, अंगणवाडी सेविका,आशासेवीका, मदतनिस पत्रकार गोकुळ हिंगणकर.सहदेवराव नळकांडे, गजानन वाकोडे, सुरेश इंगळे,रईसभाई, मिलिंद वानखडे, अनंता वाकोडे,व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व इतर उपस्थितीत गावात कार्यक्रम घेण्यात आले