युवक काँग्रेसच्या वतीने निषेध

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा बाळापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे बाळापूर तहसील कार्यालय समोर मनिषा वाल्मिकी यांना न्याय मिळण्यासाठी तसेच कॉंग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांना धक्का मारुन अडविण्यात आल्याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव अभिलाष तायडे यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर युवक काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला आहे त्यावेळी उपस्थित युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र भावना व्यक्त केल्या तर त्या वेळेस अभिलाष तायडे माजी नगरसेवक अक्रम सेठ कॉंग्रेस कमेटीचे बाळापूर तालुका अध्यक्ष अजय ताथोड युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजिद इक्बाल भुषण गुजराती अय्याज सामील जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शाहरुख भाई स्वप्नील पाठक संदेश वानखडे अविनाश कळसकार मसरत जागीरदार
विकी रौंदळे मोईन वेल्डर सचिन निंबेकर उपस्थित होते