तेल्हारा पालिके मधील सभागृहाच्या बांधकामात भ्रष्टाचार कार्यवाही करण्याची विरोधी पक्ष नेत्याची मागणी

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा नगर परिषद द्वारे हिवरखेड़ रस्त्यालगत सुरु असलेल्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामात व सदर बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी तेल्हारा पालिकेचे विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल यांनी आज १ /१०/ २०२०ला मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे .
हिवरखेड़ रस्त्यालगत बांधण्यात येत असलेल्या सामाजिक सभागृहाच्या निविदा प्रक्रियेत प्रथम कॉलच्या वेळेस अटी व शर्थी ज्या होत्या त्या वेळेस तिन निवीदा न आल्याने पालिकेने निविदा प्रक्रिया रिकॉल केली होती .दुसऱ्या वेळेस निविदा प्रक्रिया राबविताना मर्जितिल विषिष्ठ ठेकेदाराला काम मिळावे म्हणून प्रथम वेळेस निविदा प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्ति मध्ये बदल करून एक विशिष्ट अट AJAX 2000 Self-loading auto weight batcher concrete mixer स्व मालकीचे अशी अट टाकून द्वितीय वेळेस निविदा प्रसिद्ध केली व सदर निविदे मध्ये एकटेच सुरेश नाठे ठेकेदार कॉलिफ़ाय झाले व त्यांना काम सुद्धा देण्यात आले ही निविदा प्रक्रिया राबविताना अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे .निविदा रांबविताना जी विशेष अट टाकण्यात आली पण प्रत्यक्ष मात्र सभागृहाच्या प्लिंथ चे कॉकरिट काम करताना सदर मशीनचा वापर न करता साध्या मिक्सर मशीनचा वापर करून काम पूर्ण करण्यात येत आहे याचा पुरावा सुद्धा आहे तसेच प्लिंथ च्या कॉलम मध्ये अंदाज पत्रकापेक्षा कमी काम करने प्लिंथ चे खोद काम केल्यावर अंदाजे एक ते दीड फुट मुरुम टाकला नंतर त्यावर कॉलम बांधले त्यामुळे दीड फुट कॉलमची उंची कमी झाली आहे तसेच mixdesign चे Concrete मटेरियल वापरन्यात यायला पाहिजे पन तसे होताना दिसत नही सदर काम हे अंदाज पत्रका प्रमाणे होत नाही कमी प्रमाणात मटेरियल वापरल्या जात आहे .रेती घाटची हरासी झाली नसताना कामावर रेती येते कुठून याची चौकशी करावी तसेच कामावर कुठलेहि मास्क, सोशल डिस्टनसिंगचे पालन केल्या जात नाही या बाबत तक्रार केल्या नंतर सुद्धा उलट ठेकेदाराला अभय देण्यात आले सदर सभागृहाच्या बांधकामा मधील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर करवाई करावी अन्यथा आपल्या विरुद्ध वरिष्ठ कड़े न्याय मागावा लागेल तसेच सदर ठेकेदाराने शहरात निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम केले आहे या बाबत सुद्धा ठेकेदारावर कार्यवाही करून काम पुन्हा करुन घ्यावे अशी मागणी तेल्हारा नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनातून केली आहे निवेदनाच्या प्रति पालक मंत्री ना. बच्चुभाऊ कडू, आ.प्रकाश भारसाकळे आ.गोपीकिशन बाजोरिया , जिल्हाधिकारी अकोला यांच्या कडे पाठविल्या आहेत