अकोला एक्सप्रेस न्यूजद्वारा आयोजित आँनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धैचा बक्षिस वितरण सोहळा थाटात संपन्न

अविनाश पोहरे / संपादक
अकोला एक्सप्रेस न्यूज
अकोला एक्सप्रेस न्यूजचे मुख्य संपादक निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्रदिनानिमित्त आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि : 30/09/2020 रोजी द प्रोफेशनल करिअर अकॅडमी, पातूर एम.पी.एस.सी. कोचिंग क्लासेस येथे संपन्न झाला.यामध्ये प्रथम क्रमांक पटकवणारी पातुर येथील बालव्याख्याती कु.शरयु राजू उगले व स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कु़.निकीता काकड या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशिस्तिपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगर परिषद माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगर परिषद गटनेते हिदायत खान उर्फ इद्दु पहेलवान,राजू उगले नगर परिषद सदस्य पातूर,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवानंद गहिले,जेष्ठ पत्रकार राजाराम देवकर,जेष्ठ पत्रकार सि. पी. शेकुवाले,पत्रकार संतोषकुमार गवई, पत्रकार संजय गोतरकर, स्पर्धेचे परीक्षक प्रा.शंकरराव गाडगे, पत्रकार अविनाश पोहरे, पत्रकार किरण निमकंडे,पत्रकार सुनील गाडगे, पत्रकार राम वाढी, विलास भराडे ,अर्जुनसिंह गहिलोत,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे, सतिश कांबळे, प्रविण पोहरे,अमोल करवते, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश बळकार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सचे पालन करून घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्या करीता द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी तसेच अकोला एक्सप्रेस न्यूजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.