आलेगाव – जांब रोडवर दुचाकीचा गंभीर अपघात एकाची प्रकृती चिंताजनक

कृष्णा मोहाडे
ग्रामीण प्रतिनिधी आलेगाव
पातूर तालुक्यातील आलेगाव वरून ५ कि.मी. अंतरावर दुर्गम भागात असलेले जांब या गावाला जाण्यासाठी असलेल्या रोडची अवस्था खूप वाईट झालेली आहे. कोणत्याही कामासाठी जांब वासीयांना आलेगावलाच यावे म्हणून काही कामानिमित्ताने संध्याकाळी ५:३० वा.
रवी माणिक नालींदे हा युवक आलेगावला येत असताना रोड वरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात आपली दुचाकी घेऊन पडला व त्याच्या हात पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगावला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंता जनक असल्याचे सांगितले व त्याला पुढील उपचारासाठी सर्रोपचार रुग्णलाय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. शासन दरबारी वारंवार तक्रारी देऊनही या रस्त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही हा रस्ता लोकांचे जीव घेणा रस्ता झाला आहे.केंव्हा या रस्त्याची दुरुस्ती होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.