जिल्हा प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोला शहरात जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर उतरून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत दंडात्मक कारवाई केली तर ग्रामीण भागात या मोहिमेला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मास्क न वापरनाऱ्यावर दंडात्मक धडक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये २९ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यातील एकूण ५३४ नागरिक यांच्या कडून एक लक्ष सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे यामध्ये अकोला तालुक्यात २८६ अकोट तालुक्यात ४८ तेल्हारा तालुक्यात ६३ बाळापूर तालुक्यात ११ पातुर तालुक्यात ३२ मुर्तीजापुर तालुक्यात ५२ तसेच बार्शिटाकळी तालुक्यात तालुक्यात २२ व नगर परिषद परीसरात २० मास्क न वापरनाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर मास्क न वापरनाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे बाबतीत अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे समोर आले आहे परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागात मास्क न वापरताच रस्त्यावर नागरीकांची वर्दळ असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते