ताज्या घडामोडी

हिवरखेड मध्ये अवैध साठवणूक केलेला सागवान जप्त :- कारवाई मध्ये लाखो रुपयांचा सागवान जप्ती सह आरा मशीन वर करण्यात आली कारवाई

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड गावात आज वन्यजीव विभाग मार्फत लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली, या कारवाई मध्ये लक्षावधी रुपयाचे सागवान लाकूड जप्त करण्यात आली ही कारवाई हिवरखेड येथिल बंदूकपुरा भागात करण्यात आली.
वन्यजीव विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून हिवरखेड गावातली बंदुकपूरा भागात एका व्यक्तीच्या घरात अवैध रित्या सागवान ची लाकडे साठवून ठेण्यात आल्याच्या माहिती वरून वान येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्य चे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित व्यक्ती च्या अवैध साठवणूक केलेल्या लाखो रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले, या कारवाई मध्ये एका आरा मशीन वर सुद्धा वन विभाग मार्फत कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. हे सागवान या व्यक्ती ने कधी व कुठून आणले या बाबत वन्यजीव विभाग अधिक तपास करीत असूनह वन अधिकारी यांनी घटना स्थळाचा पंचनामा करीत संपूर्ण सागवान जप्त केले आहे, या सागवान तस्करी मधील खरा सूत्रधार कोण या बाबत अधिक तपास वन्यजीव विभाग मार्फत करण्यात येत आहे. ही कारवाई अकोट वन्यजीव विभागाचे उप वन सवरक्षक व ACf यांच्या मार्गदर्शनात वान येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्य चे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी व वन कर्मचाऱ्यांनी केली..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: