दहिगांव परीसरात बिबट्याची असलेली दहशत कायम युवकाने बिबट्या दिसून आल्याचे सांगितले

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव शेत शिवारात बिबट्या असल्याने रस्त्याने बकऱ्या चारत असतांना सदर दिनांक ३०सष्टेंबर रोजी दीपक अघडते नामक युवकास तो आढळून आला सदर युवकाचे असे सांगितले आहे की सदर दिसलेला बिबट्या हा निंबाच्या झाडावर बसलेला आढळला तेव्हा त्या युवकास तो बिबट्या निंबाच्या झाडावरून उतरताना दिसला ही माहिती कळताच गावचे पोलीस पाटील अरविंद अवताडे सदर घटनास्थळी दाखल झाले तेव्हा वनरक्षक मेसरे व विकास मोरे यांना माहिती कळताच ज्या ठिकाणी बिबट्या आढळला होता त्यांनी त्या ठिकाणची सदर आजूबाजूची पाहणी केली अखेर परिसरात असलेली बिबट्याची दहशत पाहून सदर दहिगाव वासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वनविभागाच्या वतीने गावात दवंडी देण्यात आली तेव्हा सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांनी सोयाबीन सोगण्याकरिता जाऊ नये असे सांगण्यात आले दिवस निघाल्यानंतर जाण्याचा इशारा दिला आहे तेव्हा वनरक्षक पाहणीच्या वेळेस जनार्धन बोरसे उपसरपंच स्वप्नील भारसाकडे लल्ला पांडवकर यशवंत चंदन माणिक इंगळे .लल्ला सुरळकर भगवान इंगळे .वैभव चंदन .रोशन चिंचोळकर व इतर उपस्थित होते