पिंपळखुटा परिसरात बिबट्या ची दहशत आलेगाव वनविभागाचे दुर्लक्ष दुसऱ्या दिवशी केला पंचनामा

नासिर शहा
ग्रामीण प्रतिनिधी पिंपळ खुटा
पातूर :- तालुक्यात पिंपळखुटा शिवारातील गेल्या महिन्याभरापासून बिबट्याची दहशत पसरल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे सध्या सोयाबीन पीक काढणीस आली असल्यामुळे शेतकरी वर्ग रात्रंदिवस मशागत करीत आहे यावेळी बिबट्याने महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे बिबट्या चा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांनी आलेगाव वनविभागाकडे वारंवार मागणी केली परंतु आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे व शून्य कारभारामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आला नाही यामुळे शेती कामे रखडली गेली आहे पिंपळखुटा येथील प्रल्हाद इंगळे यांच्या शेतात रविवार 27 रोजी च्या दुपारी बिबट्या अनेक शेतकऱ्यांनी पाहिला
त्याच दिवशी स्वप्निल दांदळे
बैलगाडी घरी घेऊन येत असताना बैलगाडी सोबत असलेली वासरीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु आजूबाजूच्या शेतशिवारातील शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या शेजारच्या सोयाबीन च्या शेतात लपून बसला दोन ते तीन तास शेतकरी बिबट्याच्या तात्काळ आत बसलेले होते परंतु बिबट्या सोयाबीन पिकातून बाहेर आला नाही सदर घटनेची माहिती आलेगाव वनपरिक्षेत्र क्षेत्राचे अधिकारी सतीश नाली नंदे यांना दिली परंतु त्याच दिवशी घटनेचा पंचनामा न करण्याच्या ऐवजी त्यांच्या हलगर्जीपणा व शून्य कारभारामुळे दुसऱ्यादिवशी 28 रोजी सोमवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली त्यामुळे परिसरात मोठी घटना नाकारता येत नाही तसेच चांगेफळ शिवारात संतोष वाहोकार यांच्या म्हशीवर हल्ला केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती रात्रीच्या वेळी संतोष वाहोकार आपल्या वावरात बांधलेल्या जनावराच्या शेजारी झोपलेला होता पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा मोठी घटना नाकारता येत नाही