ताज्या घडामोडी

छावा संघटनेचे हिवरखेड तेल्हारा ते आळसुळ रस्ता दुरुस्त करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड रोड ते तेल्हारा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून सदर रस्त्यावरून प्रवास करणे हे खूप जिकरीचे व जोखमीचे झाले आहे या रस्त्याने बरेचदा छोटे-मोठे अपघात घडत असून बेलखेड येथील एका इसमास आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे
सदर रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सदर ठेकेदार अतिशय कासवगतीने रस्त्याचे काम करीत आहे यापुढे सुद्धा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी रस्त्याच्या दुर्दशेचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अन्यथा छावा संघटना तीव्र आंदोलन उभारेल व पुढील सर्व परिणामास सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार असे संघटनेच्या मार्फत कळवले आहे सदर निवेदन हे डॉ.श्याम कोल्हे उपजिल्हाप्रमुख छावा संघटना यांच्यामार्फत निवृत्ती पाटील वानखडे, सुशील खवले, प्रवीण बानेरकर, धनराज गावंडे, निखील रोडे, ज्ञानेश्वर मानकर, उमेश कुकडे, गणेश इंगळे, प्रदीप गावंडे, व इतर छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: