धनगर समाजाचे विविध मागण्यांसाठी दर्यापूर तहसीलवर ढोल वाजवा आंदोलन.

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापुर तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी दर्यापूर तहसील कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन करून धनगर समाजाच्या मागण्यां पूर्ण होण्यासाठी व झोपलेल्या सरकारला जाग यावी यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे.धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करून एसटी चा दाखला देण्यात यावा. 1000 कोटी रुपयांची सरकारने तरतूद करून सुद्धा अजून पर्यंत अनुदान मिळाले नाही ते त्वरित मिळावे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाच्या एक हजार कोटी रुपयांचा निधी कोणाच्या घशात गेला यांची चौकशी झाली पाहिजे व तो निधी मेंढपाळ बांधवांना त्वरित मिळाला पाहिजे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊनच मेघाभरती करावी अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा या प्रमुख मागन्यासाठी दर्यापूर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधव यांच्या वतीने दर्यापूर तहसील कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ.योगेश देशमुख यांना देण्यात आले
त्यावेळी सदानंदजी नागे विलासराव अगंडते,अशोकराव नवलकार,श्रीधर कोल्हे,यांच्या मार्गदर्शनात तर डॉ.संदीप सुशिर साहेबरावजी भदे,अरविंदजी पावडे,खंडोजी पातुर्डे,अमोल नवलकार,उमेश नागे,हरिभाऊ नागे,दिगंबर नवलकार,नंदकिशोर कोगदे,अक्षय घटाळे,माणिकराव नागे,ऋषिकेश लाखे,अमोल कात्रे,सुनील गावंडे,शेखर पातुर्डे, सोपान काईंगे,अंकुश गावंडे, पियुष घटाळे,अमोल पातोंड, विशाल नवलकार,अंकुश जोगी, ज्ञानेश्वर कातकडे,संतोष कातकडे,यश जाधव,संजय पातुर्डे,योगेश पातुर्डे, संजय अघडते,संदीप नवलकार,गंगाधर साबे,संजय घटाळे,हरिष नागे,अनिल घटाळे,गजाननराव पातोंड, दीपक लताड,सतीश अघडते, गोपाल नवलकार,चेतन पाचपोहे, गोपाल नागे,राजू होपळ, गजानन नवलकर अशा अनेक धनगर समाज बांधवांच्या हस्ते व उपस्थिती मध्ये तर समस्त धनगर समाज संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ व प्रतिष्ठित समाजसेवक तसेच समस्त धनगर समाज बंधू-भगिनी यांच्या समर्थनात एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता ढोल वाजवून सरकारला जागे करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.