ताज्या घडामोडी

खंडाळा येथे युवासेनेच्या पुढाकाराने राशनकार्ड वाटप

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापुर तालुक्यातील खंडाळा येथे अनेक गरजवंत लोक राशनकार्ड फाटल्यामुळे तसेच राशनकार्ड गहाळ झाल्यामुळे शासनाकडून सवलतीच्या दरात वितरीत होणाऱ्या धान्यापासून वंचित राहत होते या गरजवंत लोकांना नवीन राशनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बाळापुर तालुका युवासेना प्रमुख महेश मोरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधून राशनकार्ड देण्यासाठी मोहीम राबविली होती
या मोहिमेत गावातिल जवळजवळ ८० लोकांकडे स्वतः च्या कुटुंबात राशनकार्ड नसल्याचे आढळून आले होते या सर्व कुटुंबाना नव्याने राशनकार्ड मिळाले पाहिजे यासाठी ज्याच्याजवळ राशनकार्ड नाही तसेच अनेकांची राशनकार्ड खराब झाले त्या सर्वाचे कार्ड मिळावे यासाठी लागणारी कागदपत्रे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानी एकत्र गोळा केले होते यातील जवळजवळ ७२ लोकांना नवीन राशनकार्ड बाळापुर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे सतत महिणाभर पाठपुरावा करून तयार करून घेऊन वितरण करण्याचे काम देखील नुकतेच करण्यात आले बाळापुर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात आ नितिनबाप्पु देशमुख यांच्या मार्गदर्शनात हि मोहीम राबविल्या गेली असून ज्या गावातील शिवसेना पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत त्या गावात आतापर्यत राशनकार्ड वितरण झाले असून लवकरच उर्वरीत गावात देखील राशनकार्ड वितरण केल्या जाणार आहे खंडाळा येथे महेश मोरे,मंगेश काठोळे,शरद यादगिरे,विजय धांडे,अनिल इंगळे आदीनी रविवार दि २७/९/२० ला प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन विनामूल्य राशनकार्ड वितरीत केले असून यामुळे गरजवंत लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: