आकाशाला गवसणी घालणाऱ्या ज्योतीताई ठरल्या प्रेरणादायी
वृत्तवेध
राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला आयुष्याचा खडतर प्रवास करीत ज्योतीताई देशमुख प्रेरणादायी ठरल्याची वास्तविकता समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील कट्ट्यार यो छोट्याशा गावातील ज्योतीताई यांच्या जीवनातील खडतर प्रवास सर्वसामान्य माणसाचे डोळे निश्चितच पान्हावल्या शिवाय राहणार नाहीत शिक्षणाचा फार मोठा गंध नसतानाही आयुष्याचा खडतर प्रवास करीत न डगमगता मागे वळून न पाहनाऱ्या ज्योतिताई स्वतः चे छत्र हरपले असतानाही नैराश्य च्या भाऊगर्दीत न हरपता यशस्वी जिवनाची वाट मोकळी करून आजरोजी यशाच्या शिखरावर जाऊन आकाशाला गवसणी घातली आहे तर कौटुंबिक कलह वेळोवेळी निर्माण होत असताना केवळ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी उद्भवलेल्या सर्वांगीण अडीअडचणीला धैर्याने सामोरे जात सुखी आयुष्याच्या सीहासनावर विराजमान झाल्या आहेत तर त्यानी इच्छा शक्ती व आत्मविश्वास असेल तर काहीही शक्य असल्याचे सिद्ध केले व पंचक्रोशीत प्रेरणादायी ठरल्या आहेत तर पातुर विकास मंच कडुन ज्योतीताई यांचा यथोचित सन्मान सन्मान करूण इतरा समोर आदर्श निर्माण केला आहे