ताज्या घडामोडी

कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी समानता बहुद्देशीय संस्था अकोली बु.अकोला यांच्या कडून मतिमंद विद्यालयास सॅनिटाइजर ची फवारा मशीन भेट.

अविनाश पोहरे / पातूर

दिनाक २४/०९/२०२० रोजी शेगांव शहरातील श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात शहरातील नगरसेविका प्रीतीताई शेगोकार यांच्या उपस्थिती मधे समानता बहुद्देशीय संस्था अकोली बु. अकोला अध्यक्ष सिमा संदीप खंडारे यांचा हस्ते कोविड -१९ चा प्रसार रोखन्यासाठी विद्यालयाला सॅनिटाइजर ची फवारा मशीन भेट देऊन सदर आदर्श प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी शहरातील नगरसेविका प्रीतीताई शेगोकार, भूषण दाभाडे पाटील,नारायण शेगोकार, संदेशकुमार शेगोकार व भारत गवारगुरु यांनी या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास उपस्थित राहून महाविद्यालयातील वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करून समानता बहुद्देशीय संस्था वेळोवेळी होईल तशी मदत करणनार असल्याचे कळवले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंढे काऊन्सलर पोकळे आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाने समानता बहुद्देशीय संस्थेला प्रशस्तिपत्र देऊन विशेष आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: