जि.प.उर्दू प्राथमिक शाळा कान्हेरी गवळी येथे शालेय पोषण आहाराचे वाटप.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर/जि.प.उर्दू प्राथमिक शाळा कान्हेरी गवळी येथे शालेय पोषण आहार अंतर्गत सर्व मुलांना सोशल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून तांदूळ,डाळीचे वितरण दिनांक २४ सप्टेंबर २० गुरुवार रोजी करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य कान्हेरी गवळी सौ वर्षा गजानन वजीरे मॅडम पंचयात समिती सदस्य श्री निलेश भाऊ इंगळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नसीर शाह ,केंद्र प्रमुख श्री.म.सु.वानखेडे सर ,गजानन भाऊ वजीरे ,मुख्याध्यापक ताज मोहम्मद ,मोहम्मद तौसिफ सर,व पालक वर्ग उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विध्यार्थ्यांना कोरोना या आजारा विषयी मार्गदर्शन करून सुरक्षितता पाळण्याचे आव्हाहन करण्यात आले.या वेळी जि.प. सदस्य सौ.वर्षाताई वजीरे मॅडम यांनी शाळेला एक वर्ग खोली मंजूर करण्याचे आश्वासन दिले.शाळेत असलेल्या तांदुळाचे व परिसर पाहून वर्षाताईनी समाधान व्यक्त केले . ग्राम पंचयात कान्हेरी गवळी १४ व्या वित्त आयोगातून शाळेला वाल कम्पाउंड ,पेव्हर्सचे काम,आर ओ प्लांट चे काम पूर्ण झाल्या बद्दल ग्रामविकास अधिकारी देशमुख साहेब,सरपंच शेख नसीर भाई यांचे शाळा व्यवस्थापन समिती शिक्षकवृंदच्या वतीने आभार मानण्यात आले.