दहिगाव शिवारात बिबट्या ने सलग दुसऱ्या दिवशी केली शिकार नागरिकांमध्ये दहशत.

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
तेल्हारा शेगाव रोड वर असलेले दहिगाव शेत शिवारात दिनांक 18 सप्टेंबर ला तेल्हारा पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान बिबट्या आढळून आला होता तेव्हा तेल्हारा पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलिस पाटील यांना गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले होते. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी सुद्धा येथे येऊन तपास करून गेले पण सदर च्या काळात पाऊस भरपूर झाल्याने बिबट्या चे ठसे दिसू शकले नाही त्यामुळे त्याचा शोध घेता आला नाही.
मात्र सलग दोन दिवसांपासून रात्री च्या वेळेत बिबट्या ने याच परिसरात हरिणाची शिकार केल्याचे गावातील मजुरांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सदरचा प्रकार गावात नागरिकांना सांगितला ही बाब वाऱ्या सारखी सम्पूर्ण तालुक्यात पसरली सोबतच प्रशासन सुद्धा सज्जग होत घटनास्थळी दाखल झाले यामध्ये तेल्हारा पोलीस, वन विभाग अधिकारी, यांच्या समवेत अनेक नागरिकांनी सुद्धा बिबट्या चे ठसे पाहिले वन विभागाने गावातील व परिसरातील नागरिकांना सतर्कता बाळगणे बाबतीत सांगितले व घटनेच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे मात्र परिसरातील नागरिकांनी शेतात जातांना काळजी घ्यावी.