नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पथदिवे सहा मिळण्यापासून बंद!

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्ड क्रमांक १ मधिल पथदिवे सहा महिन्यापासून बंद आहेत तरी ग्रामपंचायत कार्यालयाचे सक्षम दुर्लक्ष आहे नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक १ मधिल पथदिवे बंद असल्यास वार्ड क्रमांक १ मध्ये सर्विकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत सरपंच यांचा कार्यकाल संपल्यानंतर नया अंदूरा गावचा वाली प्रशासकीय अधिकारी म्हणजे ग्रामपंचायत प्रशासक साहेब अाहेत परंतु नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी साहेब गावात हजर राहत नाहीत व गावातील परिस्थिती जानुन घेण्यासाठी गावचा वाली कोण असे ग्रामस्थांनी म्हटले आहे पावसाळ्याचे दिवस चालू असतांना नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक १ मधील एकही पथदिवे सुरू नाहीत व वार्ड क्रमांक १ मध्ये अंधाराचे वातावरण निर्माण असते व पावसाळ्यात नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक १ मधील लहान मुलांना रात्री अंधारात ये-जा करावी लागत असल्याने नया अंदूरा गावातील लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक १ मधिल समस्या नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये सर्विकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते व नया अंदूरा गावात पावसाने हजेरी लावली की रस्त्यावर चिखल की चिखलात रस्ता असे पाहायला मिळते तरी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करीत आहेत नया अंदूरा गावातील समस्या जानुन घेण्यासाठी नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत सरपंच यांचा कार्यकाल संपल्यानंतर ग्रामपंचायत प्रशास म्हणून आलेले अधिकारी यांनी आतापर्यंत अजूनही नया अंदूरा गावात भेट सुध्दा दिली नाही व गावातील परिस्थिती जानुन सुध्दा घेतली नाही म्हणून गावातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत