ताज्या घडामोडी
मराठी कवी लेखक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश पाकदुणे यांची निवड !

अविनाश पोहरे / पातूर
अकोला : मराठी कवी लेखक संघटनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक निलेश पाकदुणे यांची केंद्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे व कार्यकारिणीने एकमताने निवड केली आहे.
उपाध्यक्षपदी कवी,स्तंभलेखक अमोल गोंडचवर तसेच सचिवपदी प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक स्वप्नील इंगोले, कोषाध्यक्षपदी कवी संजय गावंडे, सहकोषाध्यक्ष पदी प्राध्यापक डॉक्टर लता थोरात सहसचिवपदी वर्हाडी भाषेचे अभ्यासक ,संशोधक डॉक्टर रावसाहेब काळे, संघटकपदी डॉक्टर अलका बोर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली. कवी,लेखकांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना कार्य करणार आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.