ताज्या घडामोडी
सिरसो येथील रस्त्याच्या बाजूला असलेले किलोमीटर स्टोन करत आहे संभ्रम निर्माण.

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरसो
सिरसो ते साखरी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नुकताच निर्माण झालेला 9 किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्या मध्ये सिरसो फाट्याजवळ राज्यमार्ग 212 कडे जाताना स्टोन व कलर फलकावरील विविध गावांच्या अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दर्शवण्यात आले आहे यामध्ये रंगवलेल्या फलकावर मुर्तीजापुर हे अंतर 3 किलोमीटर व बाजूलाच असलेला किलोमीटर स्टोन 4 किलोमीटर दर्शविण्यात आले आहे लाखपुरी हे अंतर 10 ऐवजी 15 दर्यापूर अठरा ऐवजी 26 किलोमीटर दर्शविण्यात आलेले आहे यामुळे कोणते अंतर ग्राह्य धरावे हे निश्चित होत नसल्याने जाणाऱ्या येणाऱ्या मध्ये हे संभ्रम निर्माण होत आहे यामध्ये योग्य ती दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिका कडून होत आहे•
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.