ग्राम हाता ता बाळापूर जिल्हा अकोला येथील युवक विद्युत शाक लागुन मृत्यू !

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
मौजे हाता या बाळापूर येथील प्रतिष्ठित शेतकरी गणेश वासनकार ह्यांचा मुलगा गौरव गणेश वासनकार ह्यांस निंबा फाटा येथे मोटरसायकल सर्व्हिस सेंटर वर मोटर सायकल वाटर सर्व्हिसिग करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू करण्यात गडबडीत बिघाडामुळे गौरव ह्यांस जोरात विद्युत शाक लागल्यामुळे तो जोरात फेकला गेला हजर नागरिकांनी खुप शर्थीचे प्रयत्न केले व त्यांस उपचारासाठी अकोला येथे घेऊन जात असताना मधेच त्याची प्राणज्योत मालवली गौरव हा खुप विनयशील व कुशल सर्वात मिळुन मनमिळाऊ व सर्वांचा चाहता व गणेश वासनकार ह्यांचा एकुलता एक मुलगा होता अचानक असा प्रसंग ओढवलयामुळे तयाचै कुटुंबातील आई वडील बहीण काका समस्त वासनकार परिवारावर खुप मोठं दुःख कोसळले आज दि २४/०९/२०२० हाता गावातील स्मशान भूमीत संपुर्ण गाव व परीसरात चाहते मित्र न नागरिक उपस्थित राहुन जड अंतःकरणाने गौरव वासनकार ह्यांस प्रत्येकाने आसवांनी भरल्या डोळ्यांनी निरोप दिला