जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कान्हेरी गवळी येथे शालेय पोषण आहाराचे वाटप.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर/कान्हेरी गवळी येथे दि.२४/०९/२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कान्हेरी गवळी येथे जि. प.सदस्या सौ.वर्षाताई वझीरे व बाळापूर पंचायत समिती सदस्य श्री निलेशभाऊ इंगळे यांच्या हस्ते सोशल डिस्टनसिंग चे पालन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तांदळाचे व डाळी चे वाटप करण्यात आले याप्रसंगी केंद्र प्रमुख श्री मनसागर वानखेडे सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शकुंतला पांडे मॅडम, शिवलाल धनोकार सर, सुभाष वानखेडे सर, राऊत मॅडम,अभय मसने सर, एकनाथ कंकाळे सर, प्रवीण हुसे सर व, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माणिकराव धनोकार व सदस्य श्री गजानन हाडोळे उपस्थित होते. प्रसंगी वर्षाताई वझीरे व निलेश भाऊ इंगळे यांनी विद्यार्थ्यांना कोरोणा आजाराची माहिती सांगून शाळेत असलेल्या तांदळाची व परिसराची स्वच्छता पाहून वर्षाताई यांनी समाधान व्यक्त केले. तर निलेश भाऊ इंगळे यांनी ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व सांगून कोरोनाकाळात घरीच राहू शिक्षकांनी दिलेला अभ्यास करण्यास सांगितले.