ऐरोलीत धोकादायक वृक्षांची छाटणी.

अनंतकुमार गवई
नवी मुंबई
नवी मुंबई महानगर पालिकेच्या ऐरोली प्रभाग क्रमांक-१६, १८,२१ मधील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक एम.के.मढवी, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका विनया मढवी, ऐरोली विधानसभा युवा सरचिटणीस व माजी नगरसेवक करण मढवी, समाजसेविका तेजश्री करण मढवी यांच्या प्रयत्नाने प्रभागातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात आली.
सध्या सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष पडून मोठे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. ऐरोलीतील प्रभाग १६, १८, आणि २१ मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ सुरू असते तर सिडको निर्मित सोसायट्यांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जातात. वाढता पाऊस लक्षात घेता एखादा अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता कर्तव्यतत्पर माजी लोकप्रतिनिधी मढवी परिवाराने महानगरपालिकेच्या उद्यान विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ऐरोली प्रभाग क्रमांक-१६ ऐरोली सेक्टर-१६ मधील वीर बाजीप्रभू देशपांडे उद्यानाची झाडांची छाटणी करण्यात करून घेतली. कोरोना महामारी का संकटात राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करीत कोरणा मुक्त प्रभाग करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगरसेवक एम.के.मढवी यांनी तीनही प्रभागातील नागरिकांनाा केले आहे.