ताज्या घडामोडी
लोहारा येथे शालेय पोषण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कडधान्य वाटप.

ग्रामीण प्रतिनिधी/संतोष मोरे लोहारा
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा लोहारा येथे शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य वाटप करण्यात आले सदर वाटप खालील प्रमाणे करण्यात आले तांदूळ ३ किलो ४०० ग्राम हरभरा १ किलो २०० ग्राम मुंगदाळ ६०० ग्राम या प्रमाणात वाटप करण्यात आले. सदर वाटप करता वेळी लोहारा शाळेचे केंद्र प्रमुख राजेश लोळ मुख्याध्यापक अस्मिता ठाकरे मॅडम सहाय्यक शिक्षिका अंजली राजवैद्द मॅडम, माजी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक गजानन पटोकार, भामोद्रे सर ,चंदनगोळे सर, प्रफुल्ल सर,स्वयंपाकी प्रकाश वावरे शाळा समिती अध्यक्ष धम्मपाल मोरे सरपंच यांचे पती सलीम देशमुख ग्रामविकास अधिकारी जामोदे साहेब यांच्या उपस्थितीत कडधान्यांचे वाटप करण्यात आले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.