बंद ला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद.

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाच दिवस बंदचे आवाहन करण्यात आले असता पहिल्याच दिवशी अकोला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स कडुन सलग पाच दिवस बंदचा निर्णय घेण्यात येवून या निर्णयाला प्रशासनाच्या वतीने सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते दरम्यान बंदच्या पहिल्या दिवशी शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी धोरण आखण्यात आले असल्याचे चित्र पाहायला मिळते तर शहरासह जिल्ह्यात बंद चे करण्यात आलेल्या प्रशासनाच्या आवहानाल काही व्यवसायीक संघटना यांनी विरोध दर्शविला तसेच राजकीय वर्तुळातून सुद्धा या बंदला विरोध करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असल्याची माहिती आहे तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडु यांनी नागरिकांनी कोरोना संदर्भात सुरक्षितता बाळगावी व बंदला प्रतिसाद देण्याबाबत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते