पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी.

नासिर शहा
ग्रामीण प्रतिनिधी पिंपळखुटा
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकाचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतजमिनीचे व इतर पिकाचे नुकसान झाले आहेत प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झालेले आहेत मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात आलेल्या पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन च्या शेगा मभून कोण निघायला लागले आहेत
कापूस, पिकांमधून कापसाचे कोम निघत या पिकांची नासाडी झाली आहे पिंपळखुटा , भागात पिकाचे नुकसान झाले आहे.याशिवाय काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे सुद्या नुकसान झाले आहे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात यावा हवामान खात्याने जिल्ह्यात शनिवार पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.