ट्रकने दिली समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक ; तीन जण जखमी.

ग्रामिण प्रतिनिधी / रिधोरा
पंकज इंगळे
रिधोरा :- राष्ट्रीय महामार्ग क्र सहा रिधोरा येथे बाळापूर कडून अकोला कडे येत असलेल्या अवैध वाहतूक ( रेती ) घेऊन जाणाऱ्या एम एच 33 . 4836 या क्र असलेल्या ट्रकने अकोला उमरी येथील दुचाकीस्वार तीन जण हे अकोला कडून रिधोरा कडे येत असताना त्यांना या ट्रकने जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार तिचा क्र एम एच 30 बी ई 4025 या क्रमांची दुचाकी व सोबत अधिक दोन असे तीन जण जखमी झाले असून त्यांना रिधोरा येथील नागरिकांनी अकोला येथील रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली आहे व ट्रक चालकाला आपल्या ताब्यात घेऊन बाळापूर पोलीस स्टेशनला रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी माहिती देऊन त्या अपघाताचा पंचनामा करून घेतला नंतर त्या ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्या वेळी उपस्थित म्हणून रिधोरा नागरिकांनी त्या सुचकीस्वाराणा वेळेवर अकोला येथे उपचारासाठी रुग्णालयात नेल्याने त्यांचा जीव वाचविला आहे आणि त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे.