आलेगाव वनपरिक्षेत्रा मध्ये सर्रास सागवान वृक्ष तोड वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तस्करांशी लागेबांधे.

कृष्णा मोहाडे / आलेगाव प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या पांढुर्ना , शेकापूर (सात माथा) तसेच गोळेगाव या बिटांमध्ये दररोज ढवळ्या दिवसा सर्रास सागवान झाडांची कत्तल केली जात आहे याकडे संबंधित वन कर्मचारी व वन अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे हे लोक आपली ड्युटी धाब्यांवर ओल्या पार्ट्या करण्यावर करत आहेत. तिकडे झाडांच्या कत्तली राजरोसपने होत आहेत. संबंधित कर्मचारी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत जर का दुर्लक्ष नसते तर ह्या कत्तली कुऱ्हाड, करवतीने तर होतातच पण कटर मशीनने सुद्धा होत आहेत एवढे असून सुद्धा तस्करांना पकडन्यात येत नाही त्यांचे तस्करांशी लागेबांधे आहेत असे बोलले जात आहे. संबंधित कर्मचारी कोणी आठवड्यातून एकदा तर कोणी दोन वेळा आपल्या ड्युटीवर जातात. ही अवैध जंगलतोड केंव्हा थांबेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हि अवैध जंगलतोड न थांबल्यास थेट मंत्रालयाकडे मोर्चा वळविण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.