स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने आज निंबा फाटा येथे केंद्र सरकारच्या निषेध!

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
कृषीविधेयकाविरोधात निंबा फाटा येथे मोदी सरकारने किसान विधेयक म्हणून शेतकरी विरोधी अध्यादेश संसदेत पाच केला त्याविरुद्ध भारतभर सगळ्यात शेतकरीच नाराज आहेत व त्या नाराजीचे रूपांतर व वेदना आंदोलनाच्या स्वरूपात आज तो अध्यादेश जाळून व्यक्त करण्यात आले यामध्ये मधल्या असलेले किसान लोकांना पूर्ण भारतभर त्यांचा शेतीमाल विकता येईल ही गोष्ट चांगली आहे परंतु हमी भावाबद्दल कुठलेच आश्वासन व ठोस कायदा आहे त्याच्यात नसून नुसतं कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकरी त्यांच्या दावणीला बांधण्याच्या काम हे केंद्र सरकार करीत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही. त्या करिता भारत भर सर्व शेतकरी या विधेयकाचा विरोध करीत आहे. या साठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष गाणेशभाऊ खुमकर यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी निंबाफटा येथे करण्यात आलीयावेळी उपस्थित असलेल्याचे नावे पंकज दुतंडे,
विष्णू निर्मल ,रवी शिरसागर , प्रवीण दामोदर ,साबिर शहा सचिन दामोदर ,विकास दामोदर गजानन मोळक, मंगेश राठोड सचिन निर्मळ ,अजय दामोदर राजू प्रधान , गणेश भटकर गजानन, नाक्षण दामोदर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.