निंबा फाटा येथील मोबाइल टॉवर बंद पडण्याच्या मार्गावर

शेषराव बेलूरकर
ग्रामीण प्रतिनिधी/ कवठा
बाळापूर तालूक्यातील निंबा फाटा येथील अकोट रोडवर असलेल्या जिअो मोबाइल टॉवर बंद पडण्याच्या मार्गावर दिसत असल्याने नया अंदूरा गावातील विध्यार्थी व जिअो सिम कार्ड धारक संतप्त दिसत आहेत.देशात कोरोनाचे संकट अभे असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गेल्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन केले आहे त्यामध्ये शाळा महाविद्यालय बंद करण्याचा आदेश मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.त्यावेळी शाळेतील व महाविद्यालयातील शिक्षक लोकांनी आॅनलाईन क्लासेस घेणे सुरू केले होते परंतु ग्रामीण भागातील गरिब पालकांची स्मार्ट फोन विकत घेण्याची सोय नसल्याने त्यांनी कसाबसा स्मार्ट फोन विकत घेऊन विध्यार्थ्यांना दिला होता व नंतर स्मार्ट फोन मध्ये जिअो सिम कार्ड घेणे आवश्यक होते म्हणून पाचशे रुपये खर्च करून जिअो सिम कार्ड खरेदी केली होती.तेव्हांही नया अंदूरा गावातील विध्यार्थ्यांना कवरेज नसल्याने नया अंदूरा गावातील विध्यार्थी व जिअो सिम कार्ड धारकांना कवरेज नसल्याने सिम कार्ड बंद करण्याच्या मार्गाने दिसत आहेत.जिअो कंपनीचे दर महिन्याला २०० रूपये रिचार्ज व तीन महिन्याचे रिचार्ज ६०० रूपये खर्च करून सुध्दा कवरेज नसल्याने नया अंदूरा गावातील विध्यार्थी व जिअो सिम कार्ड धारक नाराजी व्यक्त करीत असतांना दिसत आहेत.निंबा फाटा येथून जवळपास १ किलो मीटरवर नया अंदूरा गाव आहे तरी सुद्धा निंबा फाटा येथून नया अंदूरा गावात जिअो कवरेज नसल्याने नया अंदूरा गावातील विध्यार्थी व नागरी संतप्त झाल्याचे दिसून येत आहे तरी सुद्धा निंबा फाटा परिसरातील नया अंदूरा गावात लवकरात लवकर जिअो कंपनीचे कवरेज उपलब्ध करून द्यावे नाहीत निंबा फाटा येथील मोबाइल टॉवर बंद करून नया अंदूरा गावातील विध्यार्थ्यांनचा व लोकांचा त्रास दूर करण्यासाठी जिअो टाॅवर देण्यात यावे नाहीत नया अंदूरा गावातील ९०% टक्के लोक जिअो सिम कार्ड धारक असल्याने त्यांना तातडीने नया अंदूरा गावासाठी स्पेशल मोबाइल टॉवर देण्याची मागणी नया अंदूरा गावातील लोक करीत आहेत