सिरसोली येथे पावसामुळे पिकांचे नुकसान

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील सिरसोली परीसरात दिनांक सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन कपाशी ज्वारी आणि उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला यंदाही ओल्या दुष्काळासारखी परीस्थिती निर्माण झाली आहे गावातील महेन्द्र सुरेश मते यांच्या १६ एकर शेतातील कपाशीचे पीक पुर्णत: वारा पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे तसेच विक्रम खोटरे यांच्या २५ एकरातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे तसेच विनोद टिकार पंकज वनकर गोपाळ खोटरे बारकु नागमते सुरेंद्र खोटरे अमोल अडाणी पप्पु हरणे संजय मगर यांच्या ही शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे कृषी विभाग व महसूल विभागाने नुकसान ग्रस्त भागातील पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी विमा कंपनीला कृषी विभागाच्या मार्फत नुकसानीची माहिती देऊन पिकविम्याची रक्कम देण्याची मागणी चे निवेदन तहसीलदार महसूल विभाग व तालुका कृषी अधिकारी यांना दिले शेतकरी वर्ग करीत आहे