नया अंदूरा शेतशिवारा अतिवृष्टी झाल्याने पीकाचे नुकसान

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा शेत शिवारात अतिवृष्टी झाल्याने या अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये उळीद मुंग सोयाबीन तिळ कपाशीचे अतोनात नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसुन येत आहे बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा,अंदूरा,हाता, कारंजा रम, हातरूण,शिंगोली, कवठा, बाहादूरा,निंबा,मोखा,वझेगाव, काझिखेड,अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिक, झुरळ, मोरझाळी टाकळी खोजबळ, या परिसरातील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसुन येत आहे व येथील शेतकऱ्यांनचे उळीद मुंग सोयाबीन तिळ कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे बाळापूर तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांना गेल्या दिन वर्षापासून अनेक योजना बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनच्या पर्यंत अजूनही पोहचल्या नाहीत त्यामधील पुढील समस्या तिन वर्षापासून शेतकऱ्यांना लाभ नाही (१) पीएम किसान सन्मान योजना (२)दुष्काळी मदतीची अपेक्षा
(३) बोंडअळी मदतीची अपेक्षा
(४) पीक विम्याची अपेक्षा अशा अनेक योजना अजूनही बाळापूर तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही बाळापूर तालूक्यात दररोज पाऊस जोरदार आपली हजेरी लावत असल्याने बाळापूर तालूक्यात अोला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व जोरदार पावसाने बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनचे अने पीके पाण्याखाली गेले आहेत त्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत जाहीर करून थेट शेतकऱ्यांनंच्या बॅंक खात्यात जमा करावी व संबंधित अधिकारी यांनी तातडीने बाळापूर तालूक्यात पंचनामे करून बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकरी करीत आहेत