तेल्हारा तालुका क्रीडा संकुल ची दुरावस्था सर्वत्र गवताचे साम्राज्य

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील तालुका क्रीडा संकुल येथील धाव पट्टी सह झालेली दुरवस्था व सर्वत्र पसरलेले गवताचे साम्राज्य यामुळे विध्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या क्रिडा संकुल कडे जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. तेल्हारा तालुक्यातील शहरामधील तालुका क्रीडा संकुल चे काम अनेक वर्षा पासून कासव गतीने सुरु आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रात तरुणांना वाव मिळू शकला नाही तसेच , पोलीस भरती , सैनिक भरती मध्ये शाररीक चाचणी सराव करण्याकरिता तालुका क्रीडा संकुल मध्ये आवश्यक असलेल्या सुविधा धाव पट्टी , गोळाफेक , लांब उडी , उंच उडी ,सिंगल बार , डबल बार , आवर भिंत, विद्युत व्यवस्था उपलब्ध नाहीत . तसेच क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे युवक व युवतींना नाईलाजस्तव शहरातील रस्त्या वरून धावावे लागते .त्यामुळे अनेक युवकांचे अपघात झालेले आहेत . तरी क्रीडा संकुल मधील धाव पट्टी प्राधान्याने दुरुस्थ करून तरुणांना धावण्या करिता विना विलंब उपलब्ध करून द्यावी तसेच इतर सर्व सोयी युक्त क्रीडा मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच क्रिडा संकुल येथे सर्वत्र पसरलरले गवत काढून ग्राउंड साफ करण्याची आवश्यकता आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात ग्राउंडवर वाढलेल्या गवता मध्ये सापांची भीती आहे रात्री व पहाटे संकुल वर सर्वदूर लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी सुध्दा मागणी होत आहे. क्रीडा संकुल मध्ये अनेक दिवसांपासून बाधण्यात आलेला बॅट मिंटन हॉल उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे व्यायामशाळा मध्ये साहित्य उपलब्ध आहे परंतु लॉक डाऊन पूर्वी पासून व्यायाम शाळा बंद आहे क्रिडा संकुल आवार भिंत साठी अनेक दिवसांपासून निधी मंजूर करण्यात आला परंतु प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात झाली नाही अश्या अनेक समस्यांनच्या विळख्यात क्रिडा संकुल सापळले आहे क्रिडा संकुल हे सुरुवातीला अनेक समस्यांच्या विळख्यात सापळले होते त्यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व क्रिडा प्रेमी युवकांनी क्रिडा अधिकारी व पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी हातात इवा, खुरपे घेऊन संकुल वरील गवत साफ साफसफाई केली होतीे व ग्राउंडवर स्वच्छता ठेवण्यात यावी यासाठी परिसरात घरोघरी जाऊन आव्हान करण्यात आले होते .तरी विद्यार्थ्यांनच्या भविष्याचा विचार करता संबधित अधिकारी व पदाधिकारी यांनी क्रिडा संकुल कडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.