जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा उगवा येथे विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे वितरण ; उगवा सर्कल मधील प्रत्येक शाळा ही डिजिटल होईल असे आश्वासन

अविनाश पोहरे / पातूर
अकोला : दि.२१-०९-२०२० रोजी अकोला तालुक्यातील ग्राम उगवा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगवा, जानकीबाई दांदळे विद्यालय उगवा, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा उगवा येथे समाज कल्याण समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य उगवा सर्कल मा. आकाश देवराव शिरसाट यांनी भेट देऊन त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टनसिंग चा वापर करून विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे वितरण करण्यात आले.ह्यावेळी सभापती शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि क्रीडाक्षेत्रातील असणाऱ्या उपलब्ध्या बद्दल चर्चा केली. उगवा सर्कल मधील प्रत्येक शाळा ही डिजिटल होईल असे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील शिक्षण हे उच्च दर्जाचे कसे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले ह्यावेळी शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.