सरिता ग्रुप तेल्हारा कडून पत्रकारांना किट वाटप
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील सरिता ग्रुप च्या माध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात तालुक्यात जेव्हा पानी फाउंडेशन चे काम सुरू होते तेंव्हा खूप मोठया प्रमाणात आर्थिक व शारीरिक मदत ह्या ग्रुप ने केली होती आणि आजही तोच वसा कायम ठेवून कोरोना योद्ध्याचे कौतुक करण्यात आले त्यात वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर , जनतेच्या सेवेत झोकुन देणारे पोलीस कर्मी, आणि लोकशाही चा चवथा आधार स्थंभ असलेल्या पत्रकार बांधवांची कोरोना किट देऊन पाठ थोपटून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरिता ग्रुप चे आनंद राठी अॅड. जितेंद्र राठी दर्शन राठी यांनी तालुक्यातील ५१शेतकऱ्यांना फवारणी किट सुद्धा दिल्या होत्या व यापुढेही ते सामाजिक कार्य करत राहू जेव्हा केव्हा गरज असेन तेव्हा हाक तुमची साथ आमची असे बोलले खरोखरच अशा कोरोना संकटात लोकांच्या मनात घर करणारी हा तालुक्यातील एकमेव ग्रुप ठरत आहे.