मन नदीला आलेल्या पुरामुळे पुन्हा शेतीपिकांचे अतोनात नुकसान

अमोल सरदार
ग्रामीण प्रतिनिधी
चिंचोली गणू
मौजे चिंचोली गणू, धाडी, बल्हाडी, तांदळी तर्फे तुलंगा,पिंपळगाव, तामसी, बटवाडी, गावांच्या लागतीने वाहत असलेल्या ‘मन’ नदीला दि. 22/09/2020ला अजून महापुर आल्यामुळे एवढ्या कमी पावसामुळे महापूर येऊ शकतो का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता. चौकशी अंति असे लक्षात आले की नदीलगतच्या कोणत्याही गावाला कोणतीही सूचना न देता शिरला धरणातून रात्रीच्या वेळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातं आहे. त्यामुळे या अवेळी आलेल्या महापुराने शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान होतच आहे पण त्याचबरोबर या नदीलगत असलेल्या गावांतील लोकांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित धरण प्रकल्प व्यवस्थापन मंडळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी कर्मचारी मंडळी वर योग्य त्या कार्यवाहीची मागणी गावकरी करीत आहेत.