माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या मोहिमेला तेल्हारा तालुक्यामध्ये दहिगाव येथून सुरवात

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
कोविड- १ ९ मोठ्या प्रमाणात प्रकोप वाढल्यामुळे मा . मुख्यमंत्री उध्वरावजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच तेल्हारा तहसीलदार , गटविकास अधिकारी , ठाणेदार व आरोग्य अधिकारी पंचगव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार दहिगाव गावामध्ये आज पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी या माहाराष्ट्र शासनाच्या आरोग्य अभियानास सुरवात झाली आहे . या अभियानानमध्ये आपले कुटुंब सुरक्षित रहावे हे शासनाचे किंवा आरोग्य विभागाची जबाबदारी नसून आपले कुटुंब हे आपली जबाबदारी आहे . यासाठी प्रत्येकाने घराबाहेर निघताना मास्क लावावे , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , दोघा मधील अंतर तीन फुटापेक्षा जास्त असावे , घरात प्रवेश केल्या बरोबर हात पाय स्वच्छ धुवावे आपले कुटुंब अबाधित रहावे हि आपली जबाबदारी आहे . प्रत्येकाने या मोहिमेत भाग घ्यावा . आपल्या घरी चाचणी घेण्या करता आरोग्य सेविका , आशा वर्कर , वैद्यकीय अधिकारी , सामाजिक कार्यकर्ते कोरोना समिती सदस्य याना सकारात्मक प्रतिसाद द्या हे अभियान यशस्वी करुया महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्या करता आपले सहकार्य अपेक्षित असे आवाहन करण्यात येत आहे आपले कुटुंब सांभाळा हीच आपली जबाबदारी आहे . कोरोना लढयामध्ये सामील होऊया . हा उपक्रम अकोला जिल्हा तेल्हारा तालुका दहिगाव या गावामध्ये सुरु करण्यात आला असून या मोहिमेमध्ये डॉ.मल साहेब वैद्यकीय अधिकारी, व्हि.टी.वाघोड़े आरोग्य सेवक, एस.एस.चौहान आरोग्य सेविका, जि.प.सदस्य ,मिराबाई पाचपोर, पं.स.सदस्य ,अरुणा चंदन सरपंच , अरविंद अवताडे पोलीस पाटील , समाधान चिकटे अध्यक्ष तंटा मुक्ती समिती , वनमाला करवते ग्रामविकास अधिकारी , कोरोना समिती सदस्य स्वप्निल भारसाकडे,उप सरपंच,ग्रामपंचायत सदस्य योगेश जुमळे, भास्कर तायडे, भगवान सिंह सोळंके,विमलबाई इंगळे,निर्मला इंगळे,वनिता लासुरकार,प्रिया धरमकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोहन चंदन, मोहन क्षावगी, अनिल इंगोले ,अतुल घंगाळ,विशाल बरिंगे,जि. प. शाळा शिक्षक,मोहीते सर,भारसाकळे सर ,खोटरे सर,वानखडे सर, आशा वर्कर किरण बावस्कार,अस्मिता तायडे,अमिता इंगळे,सोनाली इंगळे, शाळा समिती अध्यक्ष विजय आखरे, कर्मचारी मुगुटाव डाबेराव,भगवान चिंचोलकार , लताबाई भारसाकळे,दुर्गाबाई डाबेराव, व गावातील सहकार्य करणारे सर्व प्रतीष्ठीत नागरिक या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.