ताज्या घडामोडी

पोषण आहाराची तक्रार देण्यास टाळाटाळ

नासिर शहा
ग्रामीण प्रतिनिधी पिंपळखुटा

पिंपळखुटा येथील दि.पी . ई.एस विद्यालयातील शालेय पोषण आहाराचा तांदूळ मुख्याध्यापक संदीप उत्तम चव्हाण चपराशी सुरेश किशन खोडके या दोघांनी रेशन माफिया विक्री करून वाहनांमध्ये लंपास करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांनी रंगेहात पकडले धक्कादायक प्रकार 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना घेराव घातला होता सदर प्रकरणाबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना तक्रार नोंदविली तसेच मुख्याध्यापक संदीप चव्हाण सुरेश खोडके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे 24 तासाचा कालावधी उलटूनही संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नाही शालेय पोषण आहार अधीक्षक तक्रार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत मुख्याध्यापक व चक्राची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रहार संघटना पुढे आली असून अरविंद पाटील. शुभम तिथे. नामदेव कराळे. दत्ता सुडोकार . मंगेश इंगळे. शुभम देवेकर. विशाल तानकर. स्वप्निल पायघन. आदींनी विद्यालय येथे भेट देऊन ठाणेदार सचिन यादव यांची भेट घेतली यावेळी शालेय पोषण आहाराच्या अधीक्षक उपस्थित होत्या परंतु या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता याबाबत शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: