सिलेंडर स्फोटातील पीडितांना मदतीचा हात

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
हिवरखेड नजीकच्या हिंगणी गावात दोन दिवसांपूर्वी इंडियन ऑइल कंपनीच्या इंडेन गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्यामुळे कोरडे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि तीन संसार उघड्यावर आले आहेत.
जेव्हा ही बातमी हिंगणी बु. गावची लेक सौ. सुनीताताई अशोक ताथोड यांच्या कानावर आली तेव्हा त्यांनी मदतीसाठी सर्वपित्री अमावस्या हाच दिवस मुद्दाम हुन निवडला. कारण श्रद्धा हवी अंधश्रद्धा नको या विचारसरणीवर चालणारे असल्याने त्यांनी सर्वपित्री अमावस्या ह्याच दिवशी मदतीचा हात दिला कारण लोक आपल्या पूर्वजांच्या नावाचं ताट वाढतात आणि कोणी उपाशी असेल तर त्याला अर्धी पोळी पण देत नाहीत. म्हणून आम्ही आजचं या कुटुंबाला मदतीचा घास भरविला. त्यावेळी या कुटुंबाच्या भावना अनावर होऊन डोळ्यातुन अश्रु ओघळत होते. एवढंच नाही तर सुनीताताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांना ही बाब सांगितली. संग्रामभैया गावंडे यांनी सुनीताताईच्या एका शब्दावर एका क्षणाचाही विलंब न करता 15,000 रुपयांची मदत दिली. तसेच तेल्हारा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष ढोले सर यांनी तिन्ही मुलांना कपडे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा महासचिव आणि गोर्धा गावची लेक सौ. मनिषाताई देशमुख यांनी 5 लिटर तेलाची कॅन, तेल्हारा तालुका महिला अध्यक्षा सौ. पारसकर मॅडम यांच्या कडून दोन साड्या व एक 5 लिटर तेल कॅन, बाळापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आणि हिंगणी बु. गावची लेक सौ. सुनीताताई अशोकराव ताथोड यांच्या कडून तिन्ही कुटुंबाला किराणा किट, साडी चोडी, आणि 500 रुपये रोख देण्यात आले. सौ. दुर्गा संजय कोरडे हिंगणी बु. यांचे कडून 2 साड्या चोडी व कपडे देण्यात आले. सौ ममता बारब्दे 1000 रुपये दिले अश्या प्रकारे वरील सर्व मंडळींनी तन, मन , धनाने मदत केली. यावेळी डॉक्टर सेल चे तालुका अध्यक्ष डॉ. तेजराव नराजे, अशोकभाऊ नराजे, अजय लोखंडे, ऋषभ कोरडे तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. तत्पूर्वी घटनेच्या दिवशीच जी प सदस्य संजय अढाऊ यांनी 5000 रुपये रोख मदत दिली होती.
तसेच जिल्हयातील दानशुर व्यक्तींनी कुठलाही पक्षभेद न करता या परिवारास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.